जमिनीच्या वादावरून जिग्नेश आणि हार्दिक आमने-सामने

Hardik,jignesh

अहमदाबाद : कोरेगाव भीमा प्रकरणापासून पासून चर्चेत असेलेल आमदार जिग्नेश मेवाणी आणि गुजरातमध्ये भाजपला जोरदार टक्कर देणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्यात जमिनीच्या वादातून या दोघांमध्ये चांगलच बिनसल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण ?
पाटीदार आणि दलित समाजातील जमिनीच्या वादातून या दोघांत सध्या पटत नाही. गीतापूर गावातील पाच दलित कुटुंबानी निवासी प्लॉटसाठी धरणे आंदोलन छेडले होते. यांना जिग्नेश मेवानी भेट घेऊन त्यांचे समर्थन केले होते. तर गावातील पाटीदारांनी ही जमीन ग्रामपंचायतीची असल्याचं सांगत ही जमीन दलितांना देण्यास विरोध केला होता. त्यामुळे पाटीदार आणि दलित यांच्यात वाद झाले. दरम्यान जिग्नेश मेवानी यांनी दलितांनी केलेल्या आंदोलनाचे समर्थन केले. या वादावर हार्दिक पटेलने टि्वट केलं होतं. ‘गीतापुरा गावातील काही गुंड जबरदस्तीने जमिनीवर अतिक्रमण करत आहेत. त्यामुळेच पटेल समाजातील लोक धरणे आंदोलन करत आहेत. जमीनचं अतिक्रमण करू पाहणाऱ्या समाजकंटकांना कोणत्याही समाजाशी जोडण्यात येऊ नये,’ असं टि्वट हार्दिकने केलं होतं. त्यामुळे जिग्नेश आणि हार्दिक यांच्या बिनसलं आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हा वाद सोडविला असून दलितांना घर बांधण्यासाठी त्यांच्या शेतीचं अकृषी जमिनीत रुपांतर करण्यास परवानगी दिली आहे.