पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर झुनझुनवालांची ‘अकासा एअर’ या विमान कंपनीची घोषणा

झुनझुनवाला

नवी दिल्ली : सहा दिवसांपूर्वी शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सपत्निक भेट घेतली होती. या फोटोत झुनझुनवाला बसलेले तर मोदी हात बांधून उभे दिसत होते. या फोटोवर सोशल मिडीयावर प्रचंड चर्चा झाली होती. या भेटीचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व:त ट्विट केले होते. मात्र काय चर्चा झाली हे समोर आले नव्हते.

दरम्यान आता राकेश झुनझुनवाला यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘अकासा एअर’ या नागरी विमान वाहतूक कंपनी सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडे अकसा एअरकडून परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. या कंपनीला परवानगी देण्यात आली असून लवकरच या कंपनीचे विमान आकाशात झेपावणार आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झुनझुनवाला यांंच्या चर्चेचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले होते. या फोटोत पंतप्रधान उभे आणि झुनझुनवाला बसलेले दिसून येत असल्याने या फोटोंवर अनेक मिम्सही बनवण्यात आले होते. झुनझुनवालांसारखे पैसे कमवा म्हणजे देशाचे पंतप्रधानही तुमच्यासमोर उभे राहून चर्चा करतील, अशा खोचक कमेंटही या फोटोला मिळाल्या होत्या.

जेट एअरवेज कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांच्याकडे अकासा एअरची जबाबदारी देण्यात आली आहे. आता विमान खरेदीसाठी बोईंग व एअरबस या कंपन्याशी चर्चा केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या