सैराट सिनेमामुळे चर्चेत आलेल्या जेऊरमध्ये अशी राखली शिवसेनेने २५ वर्षांची सत्ता अबाधित

narayan patil vs rashmi bagal

जेऊर- सैराट सिनेमामुळे चर्चेत आलेल्या करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत २५ वर्षांची सत्ता राखण्यात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांना यश आले असून पारंपारिक विरोधक बागल गटाचा दारूण पराभव झाला आहे.संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सरपंचपदासह १५ पैकी १५ जागांवर विजय मिळविला आहे.

Loading...

jeur gram panchayat

जेऊर हे १५ हजार लोकसंख्याचे गाव असून जेऊर मध्ये मध्य रेल्वेचे रेल्वे स्टेशन आहे. जेऊर गावाला जवळजवळ ३०-४० गावे जोडली गेलेली असून दळणवळणाचे गाव असून करमाळ्याची राजधानी आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. १५ सदस्य संख्या असलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज होता परंतु ही निवडणूक पारंपारिक पाटील-बागल गटात दुरंगी लढत झाली.

jeur gram

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाटील गटाचे ३ सदस्य बिनविरोध निवडून आले तर उर्वरीत १२ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते.प्रभाग क्रमांक ३ मधून सौ जरीन सुल्लेमान मुल्ला, प्रभाग क्रमांक ४ मधून सौ धनश्री उमेश पाथ्रुडकर तर प्रभाग क्रमांक ५ मधून सौ रोहिणी शांताराम सुतार ह्या बिनविरोध निवडून आल्या.उर्वरीत १२ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते परंतु आमदार नारायण पाटील यांनी २५ वर्षांची सत्ता कायम ठेवून १५ पैकी १५ सदस्य तसेच सरपंचपदाच्या उमेदवार सौ संगिता साळवे विजयी झाल्या आहेत.बागल गटाच्या तब्बल सहा सदस्यांचे डिपोझीट जप्त झाले असून त्यातील ३ सदस्यांना शंभर मते मिळविण्यात पण अपयश आले आहे.

jallosh

या कारणांमुळे राहिली पाटील गटाची २५ वर्षांची सत्ता अबाधित

 • आमदार नारायण पाटील यांचा जेऊर परिसरातील प्रत्येक नागरीकाशी वयक्तिक संपर्क तसेच व्यापारी, शेतकरी, युवक यांच्याशी त्या त्या पातळी वर वेळोवेळी संवाद
 • जेऊर गावात आतापर्यंत मूलभूत सुविधा रस्ते पाणी वीज या साठी केलेले विकास कामे.
 • आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षात केलेल्या विकास कामांची पोच.
 • जेऊर गावातील मतदारांचा विश्वास मिळविण्यात आलेले यश.
 • गावातील प्रत्येक जाती धर्माला बरोबर घेऊन त्यांच्या सण उत्सव व लग्नकार्य या मध्ये कायमचा सहभाग.
digvijay bagal
file photo

बागल गटाच्या दारूण पराभवाची प्रमुख करणे

 • जेऊर गावात बागल गटात एकी चा अभाव
 • बागल गटाचा निवडणुकापूरताच लोक सहभाग,
 • निवडणूक संपली की पुढील ५ वर्षे जनसंपर्क नाही.
 • बागल कुटुंबाचा निवडणूक लावण्यापुरता जेऊर मध्ये सहभाग.
 • सक्षम व सर्वसमावेशक नेतृत्व व उमेदवारीचा अभाव
 • नियम कायदे या बद्दल अपुऱ्या ज्ञाना मुळे सुरुवातीलाच तीन उमेदवार पाटील गटाचे बिनविरोध झाले या मुळेही निवडणुकीत बागल गटाचे मनोधैर्य खचले.
 • प्रभावी प्रचार यंत्रणेचा अभावLoading…


Loading…

Loading...