शपथविधीसाठी कुमारस्वामींंचे उद्धव ठाकरेंना आमंत्रण

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर आता जेडीएसचे कुमारस्वामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला विरोधकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून देशभरातील नेते बंगळूरुला येणार आहेत. दरम्यान, कुमारस्वामी यांनी फोनकरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केल्याची माहिती मिळत आहे.

भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेसने जेडीएसचे कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी बिनशर्त पाठींबा दिला आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपच्या येडियुरुप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. मात्र, सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये जेडीएस- कॉंग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे.

कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने कॉंग्रेस आणि विरोधकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी , राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तामिळ अभिनेते रजनीकांत, सीताराम येचुरी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान,

आता उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याने एनडीएचा घटक पक्ष असतानाही शिवसेना विरोधकांच्या मांडीलामांडी लावून बसणार का? हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

You might also like
Comments
Loading...