कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि जेडीएसमध्ये बिनसलं !

टीम महाराष्ट्र देशा : कुमारस्वामींचं सरकार पाडण्याच्या काँग्रेसच्या हालचालीच्या वृत्तामुळं संतापलेल्या जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी ‘प्रादेशिक पक्षांना गृहित धरू नका,’ असा इशारा देत कॉंग्रेसला चांगलच झापल आहे. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

‘कर्नाटकमध्ये आम्ही मतभेद बाजूला ठेवून काँग्रेससोबत लोकसभा निवडणुका लढविण्याचं ठरवलंय. यावर सविस्तर चर्चा अद्याप व्हायची आहे. राहुल गांधी आणि कुमारस्वामी यांच्यात होणारी चर्चा काही कारणास्तव झाली नाही. मात्र, काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांना गृहित धरू नये, असा इशारा एच. डी. देवेगौडा यांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि जेडीएसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे.