जेडीएस काँग्रेस वेगळे लढल्यामुळे काँग्रेसचा पराभव – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

औरंगाबाद : कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत भाजपची सरशी झालेली आहे. निवडणुकीदरम्यान असे वाटत होते की पुन्हा एकदा कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल पण सरकार विरोधात असलेली अँँटीइंकबंंसनी लक्षात आली नाही. आणि भाजपचा विजय झाला पण यात जेडीएस ने मोठी भूमिका बजावली आहे. जेडीएसमुळे मतांचं विभाजन झालं आणि भाजपचा विजय झाला असं मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे ते आज औरंगाबाद शहरात आले असता बोलत होते.

Loading...

पुढे ते असेही म्हणाले की, या जेडीएस आणि काँग्रेस वेगळे लढल्यामुळे हा तोटा झाला आहे. जर जेडीएस आणि काँग्रेस सोबत लढले असते तर चित्र वेगळं राहिलं असतं, त्यामुळे या निकालाचा अर्थ इतकाच आहे की यापुढील काळात काँग्रेसला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर आपल्या सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवाव्या लागतील.Loading…


Loading…

Loading...