fbpx

‘जेडीयू’चं ठरलं ! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ बरोबरच !

टीम महाराष्ट्र देशा : आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए सोबतच राहण्याचा निर्णय जनता दल युनायटेडने घेतला आहे. याबाबतची घोषणा दिल्लीत बिहार भवनमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतच राहणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.” आगामी लोकसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या, हे नंतर ठरविले जाईल. मात्र, ही निवडणूक आम्ही एकत्र लढवू,” असे जेडीयूचे सरचिटणीस संजय कुमार झा यांनी सांगितले.

जेडीयूच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षाने किती जागा लढवायच्या, याबाबत चर्चा झालेली नाही. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘भाडे के टट्टू  चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र