बागल गटाला बसणार धक्का,बाजार समितीच्या सभापती पदी जयवंतराव जगताप ?

jayawantrao jagtap

करमाळा- त्रिशंकू झालेल्या करमाळा बाजार समितीच्या निवडणूकीत किंगमेकर ठरलेल्या जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी कुठल्या प्रकारची भुमिका घेतलेली नसल्यामुळे सभापती निवडणूकीत अजूनही पेच कायम असला तरी सभापती पदी माजी आमदार जयवंतराव जगताप होण्याची शक्यता दाट असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. असे झाल्यास ८ जागा जिंकणारा बागल गटाला जोरदार धक्का बसणार आहे.

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जि प अध्यक्ष संजय शिंदे त्या दृष्टीने निर्णय घेणार असल्याचे समजते बागल गटाला पाठिंबा दिला तर आपल्या गटाचे नुकसान होईल तसेच आगामी विधानसभेला मतदानाची विभागणी होणार हे निश्चित आहे. मुख्य म्हणजे बागल गटातील नाराज कार्यकर्ते सध्या शिंदे गटात आहेत त्यांचाही बागल गटाला पाठिंबा देण्यासाठी विरोध आहे. परिणामी आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटाला पाठिंबा दिला तर माजी आमदार जयवंतराव जगताप हेच सभापती होतील असा विश्वास पाटील-जगताप गटातील कार्यकत्यांमध्ये आहे. सभापती पदासाठी शिंदे गट अडून राहिले तर शिंदे गटाचे संचालक चंद्रकांत सरडे हेही सभापती पदासाठी दावेदार राहू शकतील.

सध्या बाजार समितीच्या १८ जागांपैकी पाटील-जगताप गटाकडे ८ जागा, बागल गटाकडे ८ जागा तर शिंदे गटाकडे २ जागा आहेत. सध्यातरी सभापती निवडीत काय होणार हे गुलदस्त्यात असले तरी जयवंतराव जगताप च सभापती होतील असा विश्वास त्यांच्या कार्यकत्यांमध्ये आहे.

बागल गटाने माझ्या खेटराची सुद्धा बरोबरी करु नये : जयवंतराव जगताप

करमाळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास, वर्तमान अन् भविष्य

मी मार्केट कमिटीत भ्रष्टाचार केला असेल तर भर चौकात फासावर जायला तयार – जगताप