माझ्या बापाचा पूतळा मी स्वखर्चाने बांधला, रश्मी सारखा लोकांच्या वर्गण्या गोळा करून बांधला नाही – जगताप

करमाळा – माझ्या बापाचा पूतळा मी स्वतःच्या पैशाने बांधला , रश्मी सारखा लोकांच्या वर्गण्या गोळा करून बांधला नाही . मी माझ्या बापाच्या पूतळ्याचे अनावरण करण्यासाठी सक्षम आहे. बहिण -भावानी ‘बापाचं स्वप्न ‘ म्हणून जोगवा मागणं बंद करावं अशी मार्मिक टीका माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बागल गटावर केली . कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने जेऊर येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.आपल्या खास शैलीत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी सुनिल तळेकर यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन व आभार मानले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब भोसले बप्पा हे होते. यावेळी उमेदवार प्रा. शिवाजीराव बंडगर, माढा तालुक्यातील प्रा.ननवरे , शिवसेना जिल्हा उपप्रमूख महेश चिवटे, प्रा. संजय चौधरी,विद्यमान आमदार नारायण आबा पाटील , मा. आ. जयवंतराव जगताप आदींची भाषणे झाली. यावेळी व्यासपिठावर विदयमान आमदार नारायण आबा पाटील, पॅनल प्रमूख व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमूख, उपसभापती प. स. गहिनिनीनाथ ननवरे,प.स. सदस्य अतूल पाटील, करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब लबडे, जि.प. सदस्य बिभिषण आवटे,आदिनाथचे जेष्ठ संचालक धुळाभाऊ कोकरे, राजाभाऊ कदम, सरपंच भारत साळवे,प.स. सदस्य दत्ता सरडे, शिवसेना नेते महेश चिवटे, प्राचार्य जयप्रकाश बिले, बाजार समितीचे संचालक देवानंद बागल, दत्ता गव्हाणे, प्रा. संजय चौधरी, महेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, पंडीत वळेकर, रोहिदास सातव, नितीन हिवरे, बाळासाहेब काळे, सरपंच रामभाऊ नलवडे ,अरूण यादव, महादेव डूबल,युवा नेते पृथ्वीराज पाटील, वैजिनाथ कदम, सागर दोंड,रामेश्वर तळेकर, नितीन हिवरे, सरंपच दादा कोकरे, गोरख लबडे, दशरथ दडस, आदी उपस्थित होते.

जयवंतराव जगताप यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

– करमाळा तालुक्याच्या विकासाची दुरदृष्टी ठेवून देशभक्त नामदेवराव जगताप यांनी भीमा नदी अडवुन विकासाची गंगा १९७२ला दौंड जवळ होणारे ‘ उजनी ‘ धरण स्वतःची राजकीय ताकद वापरून आणली यामूळेच या दुष्काळी सोलापूर जिल्ह्याचा कायापालट झाला अन् आजचे नंदनवन फुललेले दिसतेय.

-१९५७ साली मांगी धरणाचा नारळ फोडला. सोलापूर जि.प. सदस्याच्या खूर्चीवर बसण्याचा पहिला मान जगतापांचा आहे.

– देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर लगेच १९४८ साली शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल व्हावे. त्यांच्या रक्ताचं चिज व्हावं या साठी बाजार समितीची स्थापना केली.

– ज्या बागलांचे राजकारणाचा जन्मच माझ्या करंगळीला धरून झाला , ज्यानी दुसऱ्याचा मकाई कारखाना हिसकावून घेतला. त्यांनी उपकाराची जाणीव ठेवावी.

-कर्मयोगी गोविंदबापू नी आदिनाथच्या उभारणी साठी २४ वर्षे त्याग केला बागलानी आदिनाथ , मकाई व तालुक्यातील रस्त्यांची वाट लावली.

– वीजेच्या प्रश्नाचा, पाण्याच्या प्रश्नाचा आवाज त्यांना उठवता आला नाही म्हणून तालुका विकासापासून वंचीत राहिला.

– सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.

– २००४ साली आदिनाथचा चेअरमन असताना जिल्हयात सर्वाधिक १२०१ रु. भाव दिला.डीसीसी बँकेचा पारदर्शक कारभार केला आहे अन् करत आहे.

– बाजार समितीचा पाहिल्यांदा १९८९ मध्ये सभापती झालो तेव्हा ७ लाख उत्पन्न आज सव्वा कोटी वर नेले आहे. असे मत व्यक्त केले.

– लायकी नसलेल्या माणसाला मी मोठं केलं. माझ्या बापाचा पूतळा मी स्वतःच्या पैशाने बांधला , रश्मी सारखा लोकांच्या वर्गण्या गोळा करून बांधला नाही . मी माझ्या बापाच्या पूतळ्याचे अनावरण करण्यासाठी सक्षम आहे. बहिण -भावानी ‘बापाचं स्वप्न ‘ म्हणून जोगवा मागणं बंद करावं.

– अन्याय झाला तर निश्चीत सांगा पण चूक करुन काम सांगू नका, योग्य विधायक कामं सांगा.

– बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामं केलेली आहेत. महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमांकात नेली.

– आमच्या घराण्यात ७ वेळा आमदारकी असताना जनतेचा रुपया खाल्ला नाही , स्वतःची संपत्ती वाढवली नाही ,नाहीतर त्यांचा तळतळाट लागला असता .

– भविष्यात या भागासाठी शेतकऱ्यांच्या मुला- मुलींच्या लग्न कार्यासाठी प्रशस्त मंगल कार्यालय मासळी मार्केट, केळी रायपनींग सेंटर, कोल्ड स्टोअरेज सेंटर उभारणार आहे.