लायकी नसलेल्या माणसाला मी मोठं केलं; जयवंतराव जगताप यांनी बागल गटावर डागली तोफ

करमाळा : बागलांनी शेतकऱ्यांचे साखर कारखाने स्वतःच्या स्वार्थासाठी डबघाईला आणून दयनीय अवस्था केली आहे. लोकांना गळ्यात पडून रडून भावनीक करून ते राजकारण करत आहेत. दोन वर्षाचा पगार कामगारांचा थकवला आहे. त्यांचे संसार उध्वस्त केले आहेत. लायकी नसलेल्या माणसाला मी मोठं केलं.सत्याने , नैतिकतेने राजकारण केलेले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामं केलेली आहेत असे रोख ठोक मत बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी रयत भवन येथिलआयोजित प्रचार सभेत व्यक्त केले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर लगेच १९४८ साली शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल व्हावे. त्यांच्या रक्ताचं चिज व्हावं या साठी बाजार समितीची स्थापना केली. माझ्याकडे बाजार समिती का देवु नये हे सांगण्यासाठी विरोधकांकडे एकही मुद्दा नाही.पण विरोधकावंर शेकडो भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं म्हणत आपल्या खास शैलीत त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले.

आई कमला भवानीचे दर्शन घेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ.आर.पी. प्रमाणे दर न देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा.दगाबाजी करणाऱ्यांना घरी बसवा. पोथरे करांनीदिगंबर बागलानी आमदार असताना ११ वर्षे पाणी दिले नव्हते हे विसरू नये.आम्ही तत्वाचे राजकारण करत आहोत.करमाळा तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा व गुलाल तयार ठेवा. असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपिठावर विद्यमान आमदार नारायण आबा पाटील नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जि.प . सदस्या सविताताई राजेभोसले, सभापतीप. स. शेखर गाडे, बाजार समितीचे उपसभापती जालींदर पानसरे, नानासाहेब, सुर्वे, केमचे सरपंचअजित तळेकर,जि.प . सदस्य बिभीषण आवटे, अनिरुद्ध कांबळे, महेश चिवटे, राजाभाऊ कदम, प्राचार्य जयप्रकाश बिले, प्रा. शिवाजीराव बंडगर, अॅड . अजित विघ्ने, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, माजीउपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, प. स. सदस्य अतुल पाटील, आदी उपस्थीत होते.
यावेळी बबन मेहेर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दत्तात्रय भागडे यांनी सुत्रसंचलन करून उमेदवारांची ओळख करून दिली. यावेळी उमेदवार शंभूराजे जगताप, प्रा. शिवाजीराव बंडगर, अॅड. अजित विघ्ने, संग्राम राजे भोसले, अजित तळेकर, राजाभाऊ कदम, सौ. सविता राजे भोसले, प्रा. संजय चौधरी, प्राचार्य जयप्रकाश बिले, महेश चिवटे, पॅनल प्रमूख शहाजीराव देशमूख , विद्यमान आमदार नारायण आबा पाटील , मा. आ. जयवंतराव जगताप आदींची भाषणे झाली. संदिप ठाकर सर यांनी आभार मानले. या सभे साठी
सागर दोंड, आदम शेख, रामेश्वर तळेकर, नितीन हिवरे, दादासाहेब लबडे, दादा कोकरे, वंदन नलवडे, दत्तात्रय नलवडे, कल्याण होगले, दादा साळुंके, गोरख लबडे, शहाजी शिंगटे, जनार्दन नलवडे, संजय शिंदे बोरगाव, झुंबर कावळे, पिटू भागडे, सुंदरदास केसकर, रामलींग देशमूखे, रामदास गायकवाड, संजय ठाकर, सरपंच दादा जाधव,नागनाथ लकडे, शहाजी धूमाळ, संग्राम राजे भोसले, तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे, पोटेगाव चे सरपंच बंडू भागडे, किरण पाटील, सर्व उमेदवार, सर्व नगरसेवक, दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.