…तर माढ्यात शरद पवारांचे देखील डीपॉझीट जप्त केले असते – मोहिते पाटील

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी जरी माढ्यातून निवडणूक लढवली असती तरी त्यांचे डीपॉझीट जप्त केले असते, असा खोचक टोला जयसिंह मोहिते पाटील यांनी लगावला आहे. सहकार महर्षी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का दिला होता. यावेळी माढा मतदारसंघातील भाजप उमेदवाराला माळशिरस तालुक्यातून एक लाखांचा लीड देण्याची भीष्मप्रतिज्ञा मोहिते पाटील कुटुंबीयांनी केली होती. आपला शब्द खरा करत माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लाखभर मतांचा लीड मोहिते पाटील यांनी दिला होता. याची मुद्यावरून जयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातीलच उमेदवार असावा, अशी भूमिका मांडली आहे. दुष्काळी भागासाठी कृष्णा – भीमा स्थिरीकरण होणे गरजेचं आहे. त्यामुळे माळशिरस, सांगोला व पंढरपुरचा पाणी प्रश्न सुटणार आहे. हे करण्यासाठी विधानसभेला तालुक्यातीलच उमेदवार देण्याची गरज असल्याचं मोहिते पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या