fbpx

…तोपर्यंत मोदींना हरवणे शक्य नाही, कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे विधान

टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ च्या यशानंतर भाजपने २०१९ लाही अभूतपूर्व यश मिळवत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची चर्चा जगभर होत आहे. अशातच कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजप सरकार विषयी मोठं विधान केले आहे.

जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदींविषयी बोलताना नरेंद्र मोदी लोकांना समजेल अशा भाषेत बोलतात. मोदी यापूर्वी कधीच झाल्या नाहीत अशा गोष्टी करत आहेत, हेच लोकांच्या लक्षात राहते. ही गोष्ट जोपर्यंत विरोधक लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत मोदींना हरवणे शक्य नाही, असं विधान केले आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या सरकारचं मॉडेल पूर्णपणे नकारात्मक नाही. त्यामुळे त्यांची खलनायकासारखी प्रतिमा तयार करून काही मिळणार नाही असंही रमेश यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये काय काम केले, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत तब्बल ३० टक्के मते मिळवून ते पुन्हा सत्तेत आले. मी मोदींचा प्रशंसक किंवा टीकाकार नाही. मात्र, मोदींनी प्रचलित व्यवस्थेत नव्या गोष्टी विशेषत: प्रशासकीय अर्थशास्त्र वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने अंमलात आणले असंही रमेश म्हणाले.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले आहे. तर कॉंग्रेसची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे त्यामुळे कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळवणे कठीण झाले आहे.