आता भाजपाने एकदा स्वतंत्र लढवूनच बघाव, जयंत पाटलांच जोरदार प्रत्युत्तर

jayant patil

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर त्यांनी निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ असं आव्हानही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना दिलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. “भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघाव, राज्यात त्यांना 60-65 जागावरच समाधान मानावे लागेल”, असं जयंत पाटील म्हणाले. नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढून, आपली ताकद दाखवावी असं आव्हान दिलं होतं. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. “भाजपनेही स्वतंत्र लढावं, त्यांना केवळ 60 ते 65 जागाच मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा ते जिंकू शकणार नाहीत”, असं जयंत पाटील म्हणाले. ते पंढरपुरात बोलत होते.

‘रूग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत’

“तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.” यासोबतच, “पुढील निवडणुकीत चारही प्रमुख पक्षांनी वेगवेगळं लढायचं असं ठरवू आणि लढून बघू. या येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर चारही पक्षांपैकी कुणाला किती बेस किती आहे हे बघू,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना भाजपच्या सत्तेचा दर्प वाटला नाही, असंही ते म्हटलं.

ऊर्जा विभागाने केली विकेंद्रीकरणाच्या धोरणाची ऐशीतैशी