Share

Breaking News |“जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरेंनी बाळासाहेबांना मनस्तापच दिला”; उद्धव ठाकरेंच्या आतेबहिणीचे आरोप

मुंबई : ६ ऑक्टोबर रोजी शिंदे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे उपस्थित नव्हते .मात्र, शिंदे गटाच्या मेळाव्याला दोघेही उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुंळात अनेक चर्चा रंगल्या जात आहेत. यासंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आतेबहिण किर्ती फाटक यांनी भाष्य केलं आहे.

हे चित्र दुर्दैवी असून, जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिल्याचा आरोप कीर्ती फाटक यांनी जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्यावर केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कीर्ती फाटक यांनी हे आरोप केले आहेत. “२००९ साली स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होत्या. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे खूप गोडवे गायले होते. बाळासाहेब ठाकरे हयात असताना काँग्रेसचं गोडवे गाणाऱ्या स्मिता ठाकरेंना स्टेजवर बोलवणं हा दुटप्पीपणा आहे,” अशा शब्दात कीर्ती फाटक यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

“ज्या जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांबत माध्यमांत बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्या जयदेव ठाकरेंचा सत्कार करताय तुम्ही, याचा अर्थ काय घ्यायचा? ज्या बाळासाहेंना एकनाथ शिंदे दैवतासमान मानतात, त्यांचा विचार घेऊन पुढे चाललो, अशी वल्गना करतात हीच तुमची बाळासाहेबांबद्दलची भक्ती का?,” असा खोचक सवाल किर्ती फाटक यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाची आठवण करून देत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं, त्याला जयजयकार आणि उदोउदो करायची चटक लागली आहे. त्यामुळे त्याने स्वत:चा पक्ष स्थापन करुन बाहेर पडला,” असे किर्ती फाटक यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ६ ऑक्टोबर रोजी शिंदे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics