‘शरद पवार आंबेडकरी विचाराचे खरे वंशज,त्यांना दलित समाजाचा खरा कळवळा आहे’

मुंबई : राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड यांनी शरद पवार यांच्यावर चांगलीच स्तुतिसुमने उधळली आहेत.

आज आंबेडकरी विचाराचे खरे वंशज पवार साहेब आहेत. त्यांना दलित समाजाचा खरा कळवळा आहे. त्यांच्याच विचारांवर पाऊल ठेवून आपल्याला वाटचाल करायची आहे, असे आवाहन गायकवाड यांनी उपस्थितांना केले.

Loading...

गायकवाड पुढे बोलताना म्हणाले,लोकशाहीची लढाई झाली आणि त्यात आपण परिवर्तन करून दाखवले. याबद्दल आदरणीय पवार साहेबांचे अभिनंदन करतो की त्यांनी राज्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे सरकार स्थापन करण्याचे काम केले. राज्यात एक सामाजिक संतुलन निर्माण करण्याकरता आपण ठोस पावले उचलत आहोत याचे समाधान वाटते.

खा. पवार साहेबांनी विकास यादीत पाचव्या क्रमांकावर असलेले इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे नाव पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम केले आहे. यातून सर्व दलित समाजाला आनंद देण्याचे काम त्यांनी केले आहे. आज आपण गावांच्या रचनेत फेरबदल करण्याची गरज आहे. गावागावात असलेल्या अदृश्य भिंती तोडण्याचे काम आपण करण्याची गरज आहे. जातीवाचक नावे घेणे बंद करण्याची गरज आहे असं ते म्हणाले.

यावेळी पवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मा. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.केंद्र_सरकारचे आज समाजातील पिछडलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही, असे मत खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...