बीड आणि नांदेड जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणार : जयदत्त क्षीरसागर

टीम महाराष्ट्र देशा- बीड आणि नांदेड जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील, अशी घोषणा रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे, ते काल बीड इथं रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विभागानं घेतलेल्या फळं आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यशाळेत बोलत होते.

ग्रामविकास मंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. ग्रामविकास तसंच कृषी विकासासाठी, फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना हा विषय महत्त्वाचा असल्याचं, मुंडे यावेळी म्हणाल्या. विभागात ‘पालकमंत्री पाणंद रस्ता’ हा विशेष कार्यक्रम राबवता येईल, असंही मुंडे यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या बसस्थानकाच्या कामाचं भूमिपूजन तसंच अंबाजोगाईच्या तालुका क्रीडा संकुल समितीनं विकसित केलेल्या बॅडमिंटन हॉल, कार्यालय इमारत, तसंच विविध खेळांसाठी तयार करण्यात आलेल्या मैदानाचं लोकार्पणही काल मुंडे यांच्या हस्ते झालं.

महत्वाच्या बातम्या