fbpx

शेतकऱ्यांच्या संकटकाळी धावून येणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेनाच आहे : क्षीरसागर

जालना – शेतकरी काळ्या आईवर, आपल्या मुलावर आणि आपल्या जनावरांवर अतोनात प्रेम करतो मात्र दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे अशा संकटकाळी धावून येणारा एकमेव पक्ष म्हणून शिवसेनाच आहे मराठवाड्यासाठी दीर्घकालीन योजनेची नितांत गरज असून काळ्याआईची तहान भागवणे आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणे हा महत्त्वाचा प्रश्न सोडवून मराठवाड्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी काल केले.

दरम्यान, जालना जिल्हय़ातील साळेगाव घारे येथील चारा छावणीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधताना विमा कंपन्यांना शेतकऱ्यांशी नडाल तर याद राखा गाठ शिवसेनेशी आहे असं म्हणत सज्जड दम देखील दिला.