fbpx

लोकसभा निकालांआधी राष्ट्रवादीला धक्का, जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा: बीड जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ मानले जाणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे, क्षीरसागर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्वाचे नेते असणारे जयदत्त क्षीरसागर हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून होणारे कुरघोडीचे राजकारण, तसेच क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिला होता.

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदु राहिलेल्या माझी खासदार केसरबाई क्षीरसागर यांचे जयदत्त क्षीरसागर पुत्र आहेत. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना शह देण्यासाठी मंत्रिमंडळात अनेकदा संधी देण्यात आली होती.