‘शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिलं’

टीम महाराष्ट्र देशा : बीडमधील कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे जयदत्त क्षीरसागरांवर सडकून टीका केली होती. त्या टिकेला जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर देत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. ते बीड येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी शरद पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरं फोडली. यात गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिलं. असं राज्यात अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. पवारांनी दुसऱ्याला आदेश देण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावं’ अस म्हणत शरद पवारांवर तोफ डागली आहे.

तसेच पुढे बोलताना क्षीरसागर यांनी ‘पक्षात असतानाच पवारांना विचारायचं होतं की 15 वर्षांत त्यांनी काय केलं. राष्ट्रवादीत माझी कोंडी केली होती. ते फोडण्याकरता मी सेनेत गेलो आहे. मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी जे काम या युती सरकारने केले ते काम आघाडी सरकारने केलं नाही अस विधान केले आहे. दुर्दैवाने राष्ट्रवादीत मतभेद असायला पाहिजे होते मनभेद नाही. याकरणामुळे मोठ्या प्रमाणत लोक पक्ष सोडून चालले आहेत. याचं आत्मचिंतन पवारांनी करावं असं क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

दरम्यान बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी क्षीरसागर यांना सर्वप्रथम राज्यमंत्री आपणच केले. त्यानंतरही दोनदा मंत्री करुन आमदारकीची तिकीटे दिली. एवढा काळ सत्तापदे देऊनही तुम्ही विकासासाठी जातो असे सांगता ! मग १० – १५ वर्षे काय केले? असा सवाल उपस्थित करत पवारांनी जयदत्त क्षीरसागरांवर खोचक टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या

Loading...

Loading...

Loading...