जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करणार? आझम खान यांना देणार टक्कर

टीम महाराष्ट्र देशा: येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी उमेदेवारीसाठी पक्षांतर केले आहे. आता उत्तर प्रदेश मधील अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जयाप्रदा यांना रामपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देणार असल्याची माहिती मिळत आहे. जयाप्रदा या समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्या विरोधात लढणार आहेत.

जयाप्रदा यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोकदलच्या तिकिटावर लढवली होती. तसेच जयाप्रदा आणि आझम खान यांच्यात जुने वाद असून एकेकाळी आझम खान यांच्या दादागिरीमुळेच मला रामपूर मतदारसंघापासून दूर रहावे लागते असा आरोप जयाप्रदा यांनी केला होता. मात्र आजम खान यांना रामपूर येथे धुळीत मिळवण्यासाठीच जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

3 Comments

Click here to post a comment