जयवंतराव भाऊ अन् मी एकत्र आल्यावर निकाल काय लागतो हे तालुक्यातील जनतेला माहित आहे : नारायण पाटील

jayntarao jagtap and narayan patil

करमाळा : कोळगाव धरणाचा भाऊंनी प्रस्ताव दाखल केला व मी उपसा सिंचन मी चालु केले.विकासाच्या व तत्वाच्या बाजूने रहा व चांगले भविष्य बघा. मार्केट कमिटीच्या निवणुकीत निकाल काय लागणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही कारण जयवंतराव भाऊ अन् मी एकत्र आल्यावर निकाल काय लागतो हे तालुक्यातील जनतेला माहित आहे असं म्हणत कंदर येथे झालेल्या सभेत बागल गटावर टीकेची झोड आमदार नारायण पाटील यांनी उठवली.

करमाळा तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून सत्ताधारी जगताप गटाबरोबर आमदार पाटील तसेच मोहिते पाटील गटाने युती केली आहे.तर या युती समोर बागल आणि संजय शिंदे यांच्या गटाने आव्हान निर्माण केल्याने सध्या तिरंगी लढत पहायला मिळत आहे.प्रचारात जगताप गटाने आघाडी घेतली असून सभांना देखील मोठी गर्दी पहायला मिळत आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील, खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने जयवंतराव जगताप यांच्या सोबत युती केल्याने या तिघांच्या देशभक्त कै. नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे.

यावेळी कदम रावसाो यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दत्तात्रय भागडे यांनी सुत्रसंचलन यावेळी उमेदवार दादासाहेब पाटील, शब्बीर मुलाणी, विजय नवले, विठ्ठल तळे, हरिभाऊ मंगवडे, तळेकर,विद्यमान आमदार नारायण आबा पाटील , मा. आ. जयवंतराव जगताप आदींची भाषणे झाली. य सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक दस्तगीर मुलाणी हे होते. यावेळी व्यासपिठावर विदयमान आमदार नारायण आबा पाटील, पॅनल प्रमूख व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमूख,सभापतीप. स. शेखर गाडे, केमचे सरपंच अजित तळेकर,प.स. सदस्य दत्ता सरडे,महेश चिवटे, महादेव आबा रोकडे, दिनकर रोकडे, धनंजय गायकवाड,राजकुमार देशमूख, मौला मुलाणी, बाळासाहेब काळे, सरपंच रामभाऊ नलवडे ,अरूण यादव, महादेव डूबल, युवा नेते पृथ्वीराज पाटील, वैजिनाथ कदम, सागर दोंड,रामेश्वर तळेकर, नितीन हिवरे, , रावसाहेब भांगे, दशरथ दडस, नामदेव पाटील, आदी उपस्थित होते.

आमदार नारायण पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

बागलांच्या वैचारिक पातळी बालीशपणाची व किळस वाटणारी आहे.

– मार्केट कमिटीच्या जवळपास ७० वर्षाच्या कारकिर्दीत आजपर्यंत कसलाही भ्रष्टाचार झाला नाही. अतिशय पारदर्शक कारभार चालु आहे.

– आदिनाथ व मकाई कारखान्याची बागलांनी काय वाट लावली आहे हे तुम्हाला माहित आहे. शेतकऱ्यांच्या उसाची बिले, वाहतूकदारांची बिले, कामगारांच्या पगारी ३० माहिन्यापासून थकवल्या आहेत. आदिनाथ व मकाईवर जप्तीची वेळ या बागलांनी आणली अन् सोन्यासारखे कारखाने शेवटच्या घटका मोजत आहेत.

– आमदार म्हणून उजनी कडेच्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत.२ तासाची वीज ५ तास करून लोड शेडींग चा प्रश्न सोडवला. प्रलंबीत कामे यात रस्ते, वीज , पाणी इ. अवघ्या ४ वर्षात मार्गी लावली.

– भाऊंनी डीगा बागलांना प. स. चे सभापती केले पण त्यांनी स्वार्थापोटी भाऊंना दगा- फटका केला.

– जगताप गटाच्या संस्था बळकावण्याशिवाय काहीही बागलांनी काहीही केलेले नाही.

-चुकीच्या लोकांना निवडूण देवू नका. दादासाहेब पाटलांना प्रचंड मतानी विजयी करा