भारतीय जनता पक्षाच्या महामेळाव्याची जय्यत तयारी

भाजप

औरंगाबाद: मुंबई येथील वांद्रे (पुर्व) बीकेसी मैदानावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा महामेळावा सहा एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

मुंबईला होणाऱ्या महामेळाव्यास मराठवाड्यातून भारतीय जनता पक्षाचे सव्वा लाख कार्यकर्ते जाणार आहेत. भाजपचे एक शक्तीप्रदर्शन करण्यासाठी हा महामेळावा घेण्यात येणार आहे. गेल्या महिनभरापासून या मेळाव्यासाठी राज्यभरात नियोजन करण्यात येत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून भाजपचे संगठन मजबूत करणाऱ्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही श्री. बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर, कचरु घोडके, राम बुधवंत उपस्थित होते.