Share

Jayant Patil | ऋतुजा लटकेंना शिंदे गटात आणण्याच्या प्रयत्नावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : अंधेरी पोट निवडणुका तोंडावर आले असतानाच शिंदे गट उद्धव ठाकरेंना झटका देण्याच्या तयारीत आहे. ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गट करत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे, ही योग्य बाब आहे का?, असा सवाल करत भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही, त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडली, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड-भेद वापरुन पळवायचा प्रयत्न सुरु आहे. ही महाराष्ट्रातील जनतेला आवडणारी गोष्ट नाही. अंधेरीत मराठी भाषिकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे तिथला निकाल काय येतो, याचं सर्वांनाच औत्सुक्य होतं. पण आता ठाकरे गटाचा तिथला उमेदवारच पळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशाने पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात कोणता उमेदवार उभा राहणार नाही, इसं देखील ते म्हणाले.

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आली आहे. अशातच ऋतुजा लटके या महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत आहेत. मात्र, शिंदे गट महाविकास आघाडीचा उमेदवार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे.

ऋतुजा लटके यांना आपल्याकडे आणण्याचा शिवसेना बाळासाहेबांची म्हणजेच शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी त्यांना द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.

या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, पोटनिवडणुकीवरून राजकीय रणनीती पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत होत्या. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पोट निवडणुका तोंडावर आले असतानाच शिंदे गट उद्धव ठाकरेंना झटका देण्याच्या तयारीत आहे. ऋतुजा लटके यांना शिंदे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now