Jayant Patil । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजप (BJP) सोबत जात राज्यात नवं सरकार स्थापन केलं. यावेळी शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर सेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. मात्र अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वातावरण तयार झालेलं दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील बडे नेते आता शिंदे गटातील आमदारांबाबत भाकीत करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठा दावा केला आहे. तर याआधी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी देखील असाच एक दावा केला होता.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया-
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाही. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल. उद्धव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत.
सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया –
हा दावा करताना सुषमा अंधारे म्हणाल्या कि, शिंदे गट आणि भाजप या दोघांत खूप असंतोष आहे. येणाऱ्या काळात या असंतोषाचा भडका उडेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सतत खटके उडत आहेत. मात्र, भाजप सोबत गेलेले एकनाथ शिंदे स्वाभिमान गहान ठेवतात. एकनाथ शिंदे यांचा उपमर्द करण्याचं काम सध्या भाजप मध्ये सुरू आहे. त्यांचा माईक काढला जातो. त्यांना कागद पुरवली जातात. तोंडावर कागद ठेऊन त्यांना सूचना करतात. मुख्यमंत्री सक्षम नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
आगामी काळात या असंतोषाचा भडका उडेल आणि शिंदे गटातील आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) येतील असा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. शिंदे सोबत गेलेले अनेक आमदार चिंतातुर आहेत. ते उद्धव ठाकरेंसोबत परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परत येतील की नाही माहीत नाही. पण, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. चाळीस पैकी एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane | “त्यांनीच मुलांना गेटबाहेर पाठवून…”; भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याबाबत निलेश राणेंचं मोठं वक्तव्यं
- Pankaja Munde | पंकजा मुंडेंचा अतिवृष्टी पाहणी दौरा ; शेतकऱ्यांना अश्रू अनावर
- Ramesh Kere । रमेश केरे प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब सराटेंची प्रतिक्रिया!
- Aditya Thackeray | भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी व्हावी – आदित्य ठाकरे
- Riteish Deshmukh । रितेश देशमुख आणि जेनेलियाला 15 दिवसांत भूखंड कसा दिला? ; कारखाना आणि लातूर MIDC अडचणीत