संतांच्या पालखीला हेलिकॉप्टरची परवानगी नाकारलेल्या सरकारचे मंत्रीच हेलिकॉप्टरने पंढरपुरात…

Jayant Patil

पंढरपूर : प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार हे नुकतेच नाशिक येथे हेलिकॉप्टरने आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली होती. असे असताना मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आपल्या दिलखुलास अंदाजमध्ये मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणून मी हेलिकॉप्टरने आलो असे उत्तर सांगत वेळ मारून नेली. दरम्यान, आषाढी वारीला संतांच्या पालख्या हेलिकॉप्टरने पंढरपुरात आणाव्यात अशी मागणी होत असताना सरकारने परवानगी नाकारत एस.टी या पालख्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणल्या होत्या. पण आज जयंत पाटलांचे आगमन हेलिकॉप्टरने पंढरपुरात झाल्याने नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहेत.

पंढरपूर येथे कार्यकर्त्याच्या भेटीला जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते. यावेळी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके उपस्थित होते. जलसंधारण विभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी उजनी धरण येथे (भीमानगर) जलसंपदा मंत्री जयंत पाटील बैठक घेणार होते, परंतु त्यांना हेलिकॉप्टर उतरण्यासाठी परवानगी न मिळाल्याने त्यांनी ती बैठक पंढरपूर येथे घेण्याचे निश्चित केले. ते थेट हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पुण्यात मोठी ‘वाहतूककोंडी’!

यावेळी जयंती पाटील यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला आहे. “भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघाव, राज्यात त्यांना 60-65 जागावरच समाधान मानावे लागेल”, असं जयंत पाटील म्हणाले. नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढून, आपली ताकद दाखवावी असं आव्हान दिलं होतं. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. “भाजपनेही स्वतंत्र लढावं, त्यांना केवळ 60 ते 65 जागाच मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा ते जिंकू शकणार नाहीत”, असं जयंत पाटील म्हणाले. ते पंढरपुरात बोलत होते.

यावेळी आपल्या राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून अक्षय कुमारला हेलिकॉप्टरने आल्याने विरोध केला होता. तर आपण कसे हेलिकॉप्टरने आलात असा प्रश्न विचारला त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर ते म्हणाले हेलिकॉप्टर ची मला लिफ्ट मिळाली आहे. यामुळे मी हेलिकॉप्टर ने आलो असल्याचे हसत हसत जयंत पाटील यांनी सांगितले.

सत्य परेशान हो सकता है लेकिन…!सचिन पायलटांचे सूचक विधान