चमकोगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जयंत पाटलांनी फटकारले

टीम महाराष्ट्र देशा- चमकोगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नूतन प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी फटकारले आहे. बॅनरबाजी सारख्या गोष्टींवरचे वायफळ खर्च त्वरित थांबवा असा आदेश पाटील यांनी दिला आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.

नवीन पदाधिकारी नेमल्यानंतर नेत्यांचे अभिनंदन करण्याकरिता सर्रासपणे सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून अभिनंदनाचे फलक लावले जातात. या मध्ये अभिनंदन करणे हा जरी स्वच्छ हेतू असला तरी,यामुळे चमकोगिरी आणि वायफळ खर्च होत असल्याचं समोर आलं आहे. नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वायफळ खर्च टाळण्यासाठी बॅनरबाजी सारख्या गोष्टींवरचे वायफळ खर्च त्वरित थांबवा असा आदेश दिला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे जयंत पाटलांनी ?
येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पूर्ण भर हा बुथरचना उभारणीला असायला हवा. बॅनरबाजी सारख्या गोष्टींवरचे वायफळ खर्च त्वरित थांबवा. ‘वन बूथ टेन युथ’ ची अंमलबजावणी राज्याच्या प्रत्येक बुथवर व्हायला हवी.

You might also like
Comments
Loading...