Share

Jayant Patil | जयंत पाटील अधिवेशन संपेपर्यंत निलंबित! मुंबई, नागपूर विधिमंडळ परिसरात येण्यास बंदी

Jayant Patil | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. विरोधकांनी देखील यावर बोलण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचे अनेक सदस्य बोलले मात्र विरोधकांमध्ये अजित पवार सोडून कुणाला बोलू दिले नाही. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी थेट अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सवाल केला. यावेळी जयंत पाटील अपशब्द वापरला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.

जयंत पाटील यांचे एक वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. दरम्यान या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक घेतली. यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडण्यात आला. जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. जयंत पाटील यांना यावेळेत मुंबई, नागपूर विधिमंडळ परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील-

आमदार भास्कर जाधव यांना सभागृहात बोलू न दिल्यामुळे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. यावेळी  ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ , असा शब्द जयंत पाटील यांनी वापरला. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले.

दिशा सालियन प्रकरणावर भास्कर जाधव यांना बोलून द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. मात्र, अध्यक्षांनी त्यास नकार दिला. यावर अजित पवार संतापले. तुम्हाला सभागृह चालवायचे नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या : 

Jayant Patil | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. विरोधकांनी देखील यावर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now