अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मेहबूब शेख यांच्यावरील आरोपांचं उदाहरण देऊन ते देखील सिद्ध होऊ न शकल्याचं म्हटलं आहे.
‘राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेनी आपली भुमिका स्पष्ट केलीय. हायकोर्टात देखील यापुर्वीच अर्ज दाखल केला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. अंतर्गत कुटुंबातील बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे’ असं ते म्हणले.
तर, ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षाला पोहोचणे योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे’ अशी प्रतिक्रीय जयंत पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भंडारा दुर्घटनेतील निष्पाप बळींमागे राज्य प्रशासनाचा गलथानपणा ? कारण जाणून व्हाल हैराण
- कुठल्याही परिस्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर होणारच; शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम आमदाराचा एल्गार
- किरीट सोमय्यांची धनंजय मुंडेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!