मावळमध्ये पार्थ पवारच जिंकणार, जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ गणित

parth pawar will win

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निकालांचे एक्झिट पोल रविवारी जाहीर करण्यात आले आहेत, यामध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यामध्ये भाजप – शिवसेनेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या काही जागा वाढणार आहेत. दरम्यान, न्यूज १८ लोकमतच्या एक्झिट पोलनुसार मावळत पार्थ पवार यांचा पराभव होणार असल्याचे दिसत आहे, शेकापचे नेते जयंत पाटील यांना मात्र पार्थ विजयी होणार असल्याचा विश्वास आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मैदानात उतरण्यात आले होते. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये मावळत जोरदार लढत झाली आहे. पुत्राला विजयी करण्यासाठी अजित पवारांनी जंगजंग पछाडल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असणाऱ्या शेकापने कोकणातून पार्थ पवारांसाठी मतांची जुळवाजुळव केली आहे.

शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार, पार्थ पवार यांना घाटाखालील मतदारसंघ असणाऱ्या पेण, पनवेल आणि कर्जतमध्ये चांगले मताधिक्य मिळेल, मावळ मतदारसंघात प्रभावी ठरणाऱ्या पिंपरी आणि मावळ विधानसभेत देखील राष्ट्रवादीला चांगली मते मिळतील. चिंचवडमध्ये मात्र आटीतटीचा सामना होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील ४८ जागांवरील एक्झिट पोल

न्यूज १८ लोकमतच्या

भाजप – २१ – २३
शिवसेना – २० – २२
काँग्रेस – १
राष्ट्रवादी – ४ – ६
स्वाभिमानी शेतकरी संघटना –

एबीपी एबीपी-नेल्सन

भाजप -17
शिवसेना – 17
काँग्रेस – 4
राष्ट्रवादी – 9
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1

साम – सकाळ

भाजप – १९
शिवसेना – १०
काँग्रेस – ८
राष्ट्रवादी – ८
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1

सी – व्होटर – टीव्ही ९

भाजप – १९
शिवसेना – १५
काँग्रेस – ८
राष्ट्रवादी – ६
स्वाभिमानी शेतकरी संघटना – १