मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंशी बोलताना, महाविकास आघाडी मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव मांडला. “उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप एमआयएमवर करण्यात आला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्ताव देतोय”, असे ते यावेळी म्हणाले होते. यावर आता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजपच्या वर्तनाला जलील यांचा विरोध असल्यास तो त्यांनी कृतीत दाखवला पाहिजे. देशभरात जर एमआयएमनी हीच भूमिका दाखवली. तर लोक त्यांच्यावर हळू हळू विश्वास ठेवायला लागतील”, असे ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: