Share

Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये”, जयंत पाटलांची विनवणी

Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं घोषित केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विनवणी केली असून प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी ट्विट करत त्यांच्यावर ७२ तासांमध्ये २ गुन्हे दाखल केले असून पोलिसांविरुद्ध लढाई लढणार असल्याची माहिती दिली होती.

यादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये, अशी मी त्यांना विनंती करणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आव्हाड यांना भेटण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

राजकीय लढाई इतक्या खालच्या स्तरावर महाराष्ट्रात गेली नव्हती, अशी खंत जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अशी परिस्थिती दिसत आहे. गुन्हा दाखल होण्याच्या काही तास आधी मुंख्यमंत्रीही त्या महिलेला भेटलेले दिसत आहेत. त्यामुळे हा गुन्हा त्यांनी स्वःतहून दखल घेतल्याने दाखल झालेला आहे असं दिसत असलं तरी या प्रकरणात चर्चा आणि बैठका होऊन कदाचित गुन्हा दाखल झालेला आहे किंवा त्यांना प्रवृत्त केलेलं असावं, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, आव्हाड यांना जाणूनबुजून टार्गेट करण्यात येत आहे. हे सरकार किती खूनशी प्रवृत्तीने काम करतंय. एखाद्या विरोधात काम करायचं म्हटल्यावर व्यक्तीगत जीवनात किंवा व्यक्तीगत स्तरावर जाऊन निंदा नालस्ती करण्याची व्यवस्था होतेय. आश्चर्य वाटतंय. आपल्या महाराष्ट्रात असं घडणं चुकीचं आहे, असं देखील जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं घोषित केलं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now