वाचा : प्रकाश आंबेडकरांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे खुले पत्र

टीम महाराष्ट्र देशा – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक संयुक्त पत्र लिहिले आहे. याबाबत जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे.

Loading...

पत्रात म्हंटले आहे की, देशभरात लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. आतापर्यंत भाजपा प्रणीत मोदी सरकारचा कारभार पाहिल्यावर लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान डावलून या देशामध्ये पूर्णपणे मनमानी कारभार सुरु आहे. देशातील अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी आणि बहुजन समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय, अत्याचार केला जात आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी ही लढाई आपण सर्वजण आघाडी करून एकत्र लढूया, अशी विनंती या पत्राद्वारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना केली आहे.







Loading…










Loading…

Loading...