fbpx

घरात बसून पारनेरसारखी पक्षाची लक्तरे कोणी टांगू नका,जयंत पाटलांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान

jayant patil

नगर : नगर दक्षिणच्या जागा वाटपाविषयी पक्षातूनच होत असलेल्या वक्तव्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आपसातील मतभेद बाजूला ठेवा, परस्पर जागा वाटप करु नका, जागा वाटप करण्याचा अधिकार केवळ शरद पवार यांना आहे, तो इतर कोणालाही नाही, पक्षात लोकशाही असली तरी त्याबद्दल जाहीर वाच्यता कोणी करु नये, घरात बसून पारनेरसारखी पक्षाची लक्तरे कोणी टांगू नका असा निर्वाणीचा इशारा पाटील यांनी काल दिला.

काल सायंकाळी शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या पक्षकार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आ. दिलीप वळसे, आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

दरम्यान, अहमदनगर मध्ये भाजपचे चांगलेच प्रस्थ वाढलेलं पहायला मिळत आहे. मात्र नगर जिल्हा भाजपच्या ताब्यात का गेला याचं उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्य़ात काँग्रेस व राष्ट्रवादी एक विचारांनी राहिली नाही, जिल्ह्य़ात भाजप लोकांपर्यंत पोहचलेला नाही तर आपणच कमी पडलो आहोत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दोन्ही काँग्रेसला लगावला आहे.तसेच राज्याच्या प्रमुखालाच राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज केली.