मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात फुट पडली आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे भाजप पक्षाने फुगवलेला फुगा असल्याचं अनेकांनी म्हणत भाजपचंच कारस्थान असल्याचे अनेकांनी आरोप केले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील भाजपवर घणाघात केला आहे.
हिंदुत्वाची मते जातील, आपल्याला सत्तेत येता येणार नाही, म्हणूनच त्यांनी पक्ष सोडला. ही मंडळी शिवसेनेची कधीच नव्हती. ती भाजपप्रणीत होती. शिंदे यांना बाळासाहेबांचे नाव मिळाल्याने किती पद्धतशीरपणे हे काम चालले आहे, हे स्पष्ट होते, असं जयंत पाटील म्हणाले.
यादरम्यान, आपल्याला टिकायचे असेल, तर पुढचा पक्षही तसाच फोडला पाहिजे. मात्र, शिवसेनेतील फुटीबाबत राष्ट्रवादीचे नाव घेतले जात आहे; परंतु भाजप सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच पडेल ती किंमत देऊन त्यांनी शिवसेना फोडली. शिवसेना फोडण्याचे पाप भाजपचेच असल्याचा आरोपच जयंत पाटील यांनी केला आहे.
भाजपने शिवसेना फोडली का या सवालावर निखील वागळे यांनी प्रतिक्रिया देखी दिली होती. यावेळी आता शिंदे गट निमित्त आहे. हे सर्व राजकारण भाजप करत आहे. भाजपने शिवसेना फोडली. देवेंद्र फडणवीस यांनी सगळा बेत अमलात आणला. मोदी आणि शहा यांच्या आदेशानुसार हे झाले. जेव्हा कोरोनाकाळात उद्धव ठाकरे गंभीररीत्या आजारी होते तेव्हा याची सुरुवात झाली. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्विकारलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केली. तेव्हाच एकनाथ शिंदे नाराज झाले होते. पण ते पक्षातून बाहेर पडले नाहीत. उद्धव ठाकरे गंभीररीत्या आजारी आहेत आणि त्यांचा संपर्क कमी झाला आहे. याचा फायदा घेऊन भाजपने जाळे टाकले. एकनाथ शिंदे यांना त्या जाळ्याच ओढलं आणि शिवसेनेत फुट घडवून आणली. त्यामुळे एकनाथ शिंदे हा मुखवटा आहे. खरी लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमध्ये आहे. पहीली लढाई अंधेरी पूर्वमध्ये होईल पुढची मुंबई महापालिकेची लढाई आहे, असे निखिल वागळे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut Letter | “राऊतांचं भावनिक पत्र वाचून डोळ्यात पाणी आणणऱ्या लोकांनी एकदा हा व्हिडीओ बघाच”, मनसे नेत्या कडाडल्या
- Ramdas Athawale । अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही उद्धव ठाकरेंची मशाली विझविण्याचं काम करणार – रामदास आठवले
- Samana । मोदी जगाचे नेते! देशातील प्रश्न नेहरूंचे!; शिवसेनेचा सामानातून नरेंद्र मोदींना सवाल
- MNS | ऋतुजा लटके यांच्या विरोधात ‘या’ नेत्याने रचला डाव ; मनसे नेत्याचा गंभीर आरोप
- Gulabrao Patil | संजय राऊतांनी आईला पत्र लिहिताच गुलाबराव पाटलांची देवाला प्रार्थना, म्हणाले…