fbpx

आंबेडकर यांनी कितीही टीका केली, तरी त्यांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न करू : पाटील

टीम महाराष्ट्र देशा : भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कितीही टीका केली, तरी भाजपा-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी त्यांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न करू असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्यासोबत अमरावतीला रवाना होण्यापूर्वी जयंत पाटील नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी निवडणूक होऊन जाईपर्यंत काही बोलू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाया पडले आणि ९ महिन्यांची मुदत मागून घेतली, अशी टीका देखील पाटील यांनी केली आहे.