शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या?,जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

डोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या कुलकर्णी यांनी त्यांच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला होतो, याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. धनंजय कुलकर्णी भाजपाचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष आहेत.

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे एवढा मोठा शस्त्रसाठा आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा शस्त्रसाठा सापडताच आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्राद्वारे भाजपवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलचं धारेवर धरलंआहे. ‘या शस्त्रांचा वापर करून भाजपला देशात कोणत्या दंगली घडवायच्या होत्या का ? याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं,’ अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच भाजपाचे पदाधिकारीच जर अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही. गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपाचे पदाधिकारीच करू लागले आहेत असे दिसते असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,रात्रभर या दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 1 एयरगन, 10 तलवारी, 38 बटनचाकू, 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 25 चॉपर्स, 3 कुर्‍हाडी, 9 गुप्त्या, 1 कोयता, 5 सुरे, 9 कुकर्‍याया, मोबाईल, काही रोख रक्कम असा एकूण 1 लाख 86 हजार 20 रूपये किंमतीच्या शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला.

हा दुकानदार गेल्या दोन-अडीच वर्षांपासून शस्त्रे विक्री करत असल्याचा क्राईम ब्रँचला संशय आहे. या दुकानदाराने गुंड- गुन्हेगारांना किती शस्त्रांची विक्री केली, त्या दिशेने देखील चौकशी क्राईम ब्रँच करत आहे.

महत्वाच्या बातम्या :