पाच राज्यातील पराभवामुळे भाजपा सरकार आश्वासनांचा पाऊस पाडत आहे!

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा कर्जत येथे दाखल झाली. यावेळी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणूनच आम्हाला परिवर्तन यात्रेची सुरुवात करावी लागली आहे. त्यामुळे परिवर्तन हे नक्कीच होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Loading...

मनाला वाटेल ते आश्वासन देण्याचे काम नरेंद्र आणि देवेंद्र सरकार करीत आहेत. पाच राज्यातील पराभवामुळे भाजपा सरकार आश्वासनांचा पाऊस पाडत असल्याची टीका देखील जयंत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान,याच सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी देखील मोदींवर टीकास्त्र सोडलं.येणाऱ्या निवडणुकीत यापुढे डिजिटल बॅनरवर फक्त एकच दिसेल ‘अब की बार मोदी की हार’ असा परिवर्तनाचा नारा कर्जतमधील सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

मागील चार वर्षातील मोदींचे भाषण त्यांनाच पुन्हा ऐकवले तर स्वतः नरेंद्र मोदीच पुन्हा प्रचारालाच उतरणार नाहीत अशी परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाली आहे. मोदींची भाषणे ही चेष्टेचा विषय बनला असल्याची टीका आ. मुंडे यांनी केली.Loading…


Loading…

Loading...