भाजपला पाठींबा देणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांशी जयंत पाटील करणार चर्चा

अहमदनगर: अहमदनगरच्या महापौर निवडीमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिसऱ्या क्रमाकांवरील भाजपला पाठींबा दिला, त्यामुळे पुरेसे संख्याबळ असताना देखील शिवसेना सत्तेपासून दूर राहिली तर भाजपला आपला महापौर निवडून आणता आला. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या अहमदनगरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. उद्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या नगरसेवकांसोबत चर्चा करणार आहेत.

Loading...

२८ डिसेंबरला निवडणूक झाल्यानंतर त्याच दिवशी पक्षाने सर्व १८ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पक्षादेश डावलून भाजपाला मतदान करण्याबाबत खुलासा करण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाने दिले होते. या नोटिशीची ७ दिवसांची मुदत संपल्यानंतरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता उद्याच्या चर्चेनंतर पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.Loading…


Loading…

Loading...