पात्रता नसताना सत्ता आल्याने जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटले- भाजपची टीका

पात्रता नसताना सत्ता आल्याने जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटले- भाजपची टीका

जयंत पाटील

सांगली : तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या चंद्रकांत पाटलांना सत्तेशिवाय झोप लागत नाही. सत्ता गेल्यानंतर त्यांची तडफड सुरु होते. आता पात्रता नसताना पुन्हा सत्ता आल्याने त्यांचा ताळतंत्र सुटले आहे, अशी टीका भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

पृथ्वीराज पवार म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एका मील कामगाराचे वारस आहेत. त्यांना सत्ता आली काय आणि गेली काय, फार काही फरक पडत नाही. जयंत पाटीलांनी चंद्रकांत दादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात जिल्ह्यासाठी काय दिवे लावले, याचे उत्तर द्यावे.

जयंत पाटलांचे नाव आले की घोडेबाजार, कुरघोड्या, करेक्ट कार्यक्रम, जिरवाजिरवी याचीच चर्चा होते. राज्यातील जनतेने जयंतरावांना आणि त्यांच्या पक्षाला स्पष्टपणे नाकारल्याचे त्यांची आमदार संख्या ओरडून सांगत आहे. जुगाड करून ते सत्तेत आले आहेत. ही सत्ता पचता पचेना. अनेक नेत्यांची सदसद्विवेकबुद्धी खड्ड्यात गेली आहे. संकटांनी जनता होरपळली आहे. मात्र, शंभर कोटी वसुली, मारहाण, मंत्र्याच्या पत्नीला अडकावणे, याच कामात ते व्यस्त आहेत.

डोक्यात सत्तेची हवा आहे. त्यात जयंतराव आघाडीवर आहेत. महापालिकेतून नागरिकांनी त्यांचे पार्सल दोनवेळा अनवाणी पायाने परत पाठवले. आता सरळ सत्ता येत नाही म्हटल्यावर घोडेबाजार करून महापौर केला आहे. त्याची परतफेड व्याजासह होईल. असा इशराही पृथ्वीराज पवार यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या