fbpx

भाजपच्या विजयानंतरही विरोधकांचे इव्हिएमवर खापर, जयंत पाटील म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. भाजपच्या विजयानंतरही विरोधकांकडून इव्हिएमवर खापर फोडणे सुरु आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या विजयावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत विजयाचे इव्हिएमवर खापर फोडले आहे. भाजपाचा विजय झाला हे मान्य, परंतु भाजपला बहुमत मिळेल याची शाश्वती नव्हती. देशामध्ये सरकारविरोधी वातावरण होते. रोजगार, महागाई, जातीवाद, नोटबंदी याबाबत लोक बोलत होते, मात्र निकाल काही वेगळाचं लागला, त्यामुळे हा विजय भाजपाचा आहे की ईव्हीएमचा असा प्रश्न उद्भवतो. असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. राज्यातही भाजप – सेना महायुतीने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. ३० तारखेला मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आहे. मात्र भाजपच्या विजयावर विरोधकांना आजूनही शंका असल्याचे दिसत आहे.