Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
दरम्यान, नुकतंच दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलं असल्याचा आरोप करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. यासंदर्भात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माहिती देत जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगितलं आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
जयंत पाटील म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. या चर्चेनंतर जयंत पाटील आणि आव्हाड यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदतेत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड एका महिलेला ढकलताना दिसत आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. याबाबात सांगताना, काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं आहे. मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Hera Pheri 3 | अक्षय कुमारने सांगितले हेरा फेरी 3 नाकारण्याचे कारण, म्हणाला…
- Gunratna Sadavarte | “नक्षली संघटनेच्या बैठकीत माझी हत्या करण्याचा निर्णय झाला होता”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा
- Ashish Shelar | “राजीनामा द्यायचा आहे तर द्या, ती जागा देखील आम्ही जिंकू” ; आशिष शेलारांचा आव्हाडांना टोला
- Rida Rashid | जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा नोंदवणाऱ्या रीदा राशीद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- Vivo Mobile Launch | Vivo लवकरचं लाँच करत आहे ‘हा’ मोबाईल