मुंबई : गेले १० दिवस सुरु असलेला सत्तासंघर्ष काल (गुरुवार) अखेर संपला. शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबत जात ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी काल रात्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते, असे जयंत पाटील म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जिथे – जिथे शक्य होईल. तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु.”
संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर जयंत पाटील म्हणाले, “संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीच्या शेवटी ईडीचे दिल्लीतील अधिकारी काय निर्णय देतात. हे पाहावे लागेल. कारण याआधी आमचे देखील नेते दिवसा चौकशीला गेल्यानंतर त्यांची रात्रीपर्यंत चौकशी चालली आणि रात्री उशीरा त्यांच्या अटकेच्या बातम्या येतात. मात्र संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही,” अशी अपेक्षा आपण करुयात असेही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<