Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर लावलेले आरोप आणि गुन्हे खोटे आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा केली. आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, असं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. पण आव्हाड आपल्या निर्णयावर ठाम होते आणि अखेर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा आहे. मात्र महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ. महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे.”
मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येक वेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र सर्वांगीण महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ कारण महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 14, 2022
त्याचबरोबर “सत्तेचा सदुपयोग करून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याऐवजी सत्तेला हुकूमशाहीचे अस्त्र मानून त्याचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यासाठी केला जातो आहे”, असा आरोप करत त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
“साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे”, असेही जयंत पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाडांना निलंबित करावं – चंद्रशेखर बावनकुळे
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला”; जयंत पाटलांनी दिली माहिती
- Sunil Shende Death | दिग्गज अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन, बॉलीवूड मध्ये पसरली शोककळा
- Hera Pheri 3 | अक्षय कुमारने सांगितले हेरा फेरी 3 नाकारण्याचे कारण, म्हणाला…
- Gunratna Sadavarte | “नक्षली संघटनेच्या बैठकीत माझी हत्या करण्याचा निर्णय झाला होता”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा