Share

Jayant Patil | एका मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्ह्याची जबाबदारी, पालकमंत्र्यांनी नेमकं कुठं लक्ष द्यायचं?, राष्ट्रवादीचा खोचक सवाल

Jayant Patil | मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जवळपास तीन महिने होत आले आहेत. राज्य सरकारने मागच्याच महिन्यात सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यानूसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक नाही, दोन नाही तब्बल सहा जिल्ह्यांचं पालकमंत्री पद दिलं. यावरून विरोधी पक्षनेत्यानी सरकारवर अनेक टीका, टिपण्णी केल्या. अशातच याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकार वर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ( Jayant Patil )

जिल्ह्यातील लोकांच्या काय समस्या आहेत. जिल्ह्यात काही विकास काम बाकी आहेत का हे पहाणं तिथल्या पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. मात्र सध्याच्या सरकारमध्ये एकाच मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्हांचा कारभार देण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये ते प्रत्येक जिल्ह्यावर कसं लक्ष देणार?, असा खोचक सवाल करत जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकार वर सडकून टीका केली आहे.

जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शिंदे गटात ठाकरे गटातून जेवढे काही आमदार गेले ते सर्व आमदार मंत्रिपदाची मागणी करत आहेत. त्यामुळे शिंदे-भाजप सरकार टिकणं मुश्किल असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

अजित पवार ( Ajit Pawar ) यांची राज्य सरकारवर टीका

तसेच, जयंत पाटलांसोबत विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित असल्यामुळे त्यांनीही राज्य सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणाले, “त्याठिकाणी सध्या 145 आमदारांचं संख्याबळ आहे, तोपर्यंत काही धोका नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकी परिस्थिती समोर येईल. आमदारांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं अवघड आहे.”

महत्वाच्या बातम्या :

Jayant Patil | मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जवळपास तीन महिने होत आले आहेत. राज्य सरकारने मागच्याच महिन्यात सर्व जिल्ह्यातील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now