भिडे-एकबोटे हे गुन्हेगार आहेत तर मग प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही ?

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, संभाजी भिंडेंना वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील धडपड करत आहेत, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आता प्रकाश आंबेडकर यांच्या या टीकेला जयंत पाटील यांनीदेखील तितकेच सडेतोड उत्तर दिले आहे.

संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर आर पाटील होते, आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत. तसेच भाजपचं काम काही मंत्रीच करत असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकरांनी केला. मात्र आंबेडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ‘संभाजी भिडेंचा बचाव प्रकाश आंबेडकरच करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहे. त्यामुळे संभाजी भिडेंवरून आंबेडकर आणि पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

Loading...

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राज्य सरकारला न विचारताच एनआयएकडे सोपविला आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय चुकीचा आहे. या प्रकरणाच्या तपासातील खोटेपणा उघड होईल, अशी केंद्र सरकारला भीती वाटत असल्याचे ते म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत. जर प्रकाश आंबेडकर यांना संभाजी भिडे आणि एकबोटे हे गुन्हेगार आहेत असं वाटत असेल तर मग त्यांनी कोर्टात त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही ? याचा प्रकाश आंबेडकर यांनी अगोदर खुलासा करावा. प्रकाश आंबेडकर या दोघांच्या विरोधात कोणताही उल्लेख केला नाही याचा अर्थ प्रकाश आंबेडकरचं संभाजी भिडे आणि एकबोटे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात