fbpx

आता मोदींची नाही, राष्ट्रवादीची लाट येईल – जयंत पाटील

सांगली: २०१९ मध्ये राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेवर येवू, आता आलीच तर राष्ट्रवादीची लाट येणार कारण लाट निर्माण करण्याची ताकद मोदींमध्ये नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सांगलीमध्ये त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आघाडी सरकारच्या काळात महागाई वाढल्याचा आरोप करत भाजप सत्तेवर आली. मात्र, त्यांच्या सत्ता काळात महागाई चार पटीने वाढली आहे. २०१४ मध्ये ज्या तरुणांनी मोठा रोजगार मिळण्याचा आशेने मोदींना डोक्यावर घेतले, तीच तरुणाई 2019 मध्ये भाजपला पायाखाली तुडवेल म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाना साधला