जळगावातील फ्रीस्टाईल हाणामारीच्या मुद्द्यावरून भाजपवर जयंत पाटलांचा निशाणा

टीम महाराष्ट्र देशा- भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पहायला मिळाली आहे. हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्यापक्षातील नेत्यांमध्ये झाली नसून भाजपच्याच जेष्ठ नेत्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे राज्यभरात भाजपसाठी संकटमोचक असणाऱ्या महाजन यांच्यावर आपल्या घरातील बंडखोरीचे संकट आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना-भाजप संयुक्त मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार ड़ॉ. बी.एस. पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली आहे. जळगाव लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे भाजप – सेना कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाघ आणि पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. पुढे सर्व प्रकार हाताबाहेर जात एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.

Loading...

आता याच मुद्द्यावरून महाजन आणि भाजपवर टीका होऊ लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला चिमटा काढला आहे. भाजपामधील अंतर्गत असंतोष टोकाला पोहोचला असून सत्ता जात असल्याने भाजपा वैफल्यग्रस्त झाला आहे असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा