fbpx

काय होतास तू काय झालास तू, ‘टाईम’च्या कव्हर स्टोरीवरून जयंत पाटलांचा मोदींना टोला

jayant patil

टीम महाराष्ट्र देशा : टाईम मॅगझीनने पंतप्रधान मोदींबाबत लिहिलेल्या लेखावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर धनंजय मुंडेंनंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. २०१५ साली त्यांची स्तुती करणारे मासिकच आता ‘काय होतास तू काय झालास तू’ ही परिस्थिती दर्शवित आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

अमेरिकेतील जगप्रसिद्ध असणाऱ्या टाईम मॅगझीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत लिहिलेल्या लेखामध्ये दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे देशात ध्रुवीकरण झाले आहे. लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचा उल्लेख करता येईल. असेही त्या लेखामध्ये म्हंटले आहे. याचबरोबर २०१४ पासून भारतामध्ये अनेक बदल झाले असल्याचेही त्यामध्ये म्हंटले आहे.

विशेष म्हणजे, टाईमने २०१४, २०१५, आणि २०१७ मध्ये जगातील सर्वात शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला होता. मात्र त्याच टाईमने २०१९ मध्ये जगातील सर्वात शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश केला नाही.

याचदरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यामुद्यावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या भाषणांमधून विकास कधीच गायब झाला आणि त्याची जागा जातिधर्माचे ध्रुवीकरण घेत आहे. हे आता टाईम कव्हरमुळे देखील सिद्ध झाले आहे. २०१५ साली त्यांची स्तुती करणारे मासिकच आता ‘काय होतास तू काय झालास तू’ ही परिस्थिती दर्शवित आहे. अशी टीका करणारे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.