फडणवीस साहेब इथल्या युवकांना कमी लेखू नका, जयंत पाटलांनी घेतला फडणवीसांचा समाचार

jayant patil devendra fadnvis

मुंबई : स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांनंतर महाआघाडी सरकारने भूमिपुत्रांना यामध्ये संधी देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमीपुत्रांकडे कौशल्यच नाही, ते विकसित करता येणं शक्य वाटत नाही, अशा आशयाचे संतापजनक विधान केले होत. त्याचा चांगलाच समाचार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य आहेत. फडणवीस साहेब यांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये. जे मजूर गेले ते परत येतील, त्यांचे स्वागत आहे. पण मोदींनी राबवलेला ‘स्कील इंडिया’ महाराष्ट्रात फेल गेले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांच्या दाव्यांची एकट्या फडणविसांनी केली ‘चिरफाड’

दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीनंतर, त्याला महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात आलं आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

यावेळी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला. ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो,’ असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

दरम्यान, महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना स्थलांतरित मजुरांच्या जागी स्थान मिळाल्यास मला आनंदच, मी त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यासाठी तरुणांना तसं कौशल्यही द्यावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. डायमंड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगालचा कामगार काम करतो. तो जर निघून गेला तर महाराष्ट्रातील कुठल्या कामगाराला ते कौशल्य लगेच आत्मसाद करता येणार आहे. ते कौशल्य त्याला आधी शिकावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण ; आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका