fbpx

चंद्रकांतदादांचे कौतुकच वाटते ! – जयंत पाटील

jayant patil

टीम महाराष्ट्र देशा : सांगली महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आता राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे.

महापालिका क्षेत्रातील जनतेला भेटवस्तू देऊन जिंकू शकतो हा विश्वास चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये वारंवार दिसत आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे वाटते, असा उपहासात्मक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

जयंत पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सांगली ही वसंतदादांची आहे. छोट्या-मोठ्या भेटवस्तूंना बळी पडणारी इथली जनता नाही. धर्मनिरपेक्ष विचारांना साथ देणारी जनता इथे आहे. केंद्र व राज्य शासनातील भाजपकडून सर्वच समाजघटकांची घोर निराशा झालेली आहे. त्यामुळे ही जनता महापालिकेत भाजपचा शिरकाव होऊ देणार नाही. असा घणाघात सुद्धा केला आहे.

महाआघाडीच्या सत्ताकाळात शेवटच्या दीड वर्षांत ज्या राजकीय बाबी घडल्या, त्या दुरुस्त केल्या आहेत. इद्रिस नायकवडी व आम्ही एकत्र आलो आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते.

साहेबांना कोणाला कधी काय करायचं हे कळत- जयंत पाटील

पराभवाच्या भीतीनेच सर्वत्र विरोधक एकत्र येत आहेत- चंद्रकांत पाटील